पोलिस शिपाई

शैक्षणिक पात्रता१२ वी पास किंवा शासनाने समतुल्य म्हणुन जाहीर केलेली अन्य अर्हता.
वयोमर्यादाओपन १८ ते ३८ पर्यंत,मागासवर्गीय तीन वर्षें शिथील ,माजी सैनिक,प्रकल्पग्रस्त,धरणग्रस्त – ४५ वर्षापर्यंत तसेच शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे.
निवड प्रक्रीयाजिल्हयाला पोलीस अधिक्षक,आयुक्तालयाला – पेालीस आयुक्त,एस.आर.पी.एफ ला - समादेशक यांचेमार्फत मार्फत सरळ सेवेने निवड होते.
मुलाखतमुलाखत घेतली जात नाही.
निकालशारीरिक चाचणी व लेखी परीक्षा या दोन्हीच्या गुणांची बेरीज करुन गुणवत्ता यादी लावली जाते.
नियुक्तीजिल्हा - पोलीस अधिक्षक,आयुक्तालय - पोलीस आयुक्त,एस.आर.पी.एफ - समादेशक यांचे अधिपत्याखाली.
वेतनश्रेणी५२०० - २०२०० अधिक ग्रेड पे - १९०० रुपये,विशेष वेतन व नियमानुसार असणारे सर्व भत्ते.

शारीरिक पात्रता

 उंचीछाती
पुरुष उमेदवार१६५ सें.मीन फुगवता ७९ सें.मी फुगवून ८४ सेंमी
महिला उमेदवार१५५ सें.मी ------
एस.आर.पी.एफ पुरुष उमेदवार१६८ सें.मीन फुगवता ७९ सें.मी फुगवून ८४ सेंमी

शारीरिक चाचणी पुरुष

अ.क्रपुरुष उमेदवार परीक्षागुण
१६०० मी धावणे२०
१०० मी धावणे२०
गोळाफेक२०
लांब उडी२०
१० पुल अप्स२०
एकूण गुण१००

शारीरिक चाचणी महिला

अ.क्रमहिला उमेदवार परीक्षागुण
८०० मी धावणे२५
१०० मी धावणे२५
गोळाफेक२५
लांब उडी२५
एकूण गुण२५

शारीरिक चाचणी एस.आर.पी.एफ पुरुष

अ.क्रएस.आर.पी.एफ पुरुष उमेदवार परीक्षागुण
५ कि.मी धावणे५०
१०० मी धावणे२५
लांब उडी२५
एकूण गुण१००
महिला उमेदवारांना संधी नाही

लेखी परीक्षा अभ्यासक्रम

विषयअभ्यासक्रमगुण
मराठी व्याकरणमराठी वर्णमाला,शब्दांच्या जाती,लिंग,वचन,विभक्ती व त्याचे प्रत्यय,काळ व अर्थ आणि त्याचे उपयोग,प्रयोग,समास,वाक्यांचे प्रकार,म्हणी,वाक्यप्रचार, शब्द समुहाबददल एक शब्द,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द,अलंकारीक शब्द व त्यांचे अर्थ,अलंकार२५
अंकगणितसंख्या,लसावि,मसावि,घातांक,कंस सोडवणे,सरळव्याज,चक्रवाढ व्याज,गुणोत्तर प्रमाण,सरासरी,दशांश अपूर्णांक,व्यवहारी अपूर्णांक,गणित संकीर्णी२५
बुद्धिमत्तामराठी वर्णमाला,इंग्रजी वर्णमाला,संख्यामाला,अक्षरमाला,समसबंध,सांकेतिक भाषा,नातेसंबंधावर आधारीत प्रश्न,आकृत्यांवर आधारीत प्रश्न,संकीर्ण२५
सा.अध्ययन व चालु घडामोडीमहाराष्ट्राचा व भारताचा भूगोल,महाराष्ट्राचा व आधुनिक भारताचा इतिहास,समाजसुधारक,भारतीय राज्यघटना, सामान्य विज्ञान, पंचायतराज,महसुल प्रशासन,पोलीस प्रशासन, जिल्हा-राज्य-राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चालु घडामोडी,पोलीस घटकाची माहिती उदा.सिंधुदुर्ग जिल्हयाचा पेपर असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा विशेष माहिती असावी.२५
एकूण गुण१००

पोलीस भरतीची संपुर्ण प्रक्रीया

भरतीची तारीख व जाहीरातसंपुर्ण महाराष्ट्रात होणा-या जिल्हा पोलीस,एस.आर.पी.एफ,आर.आर.बी, रेल्वे पोलीस भरतीची तारीख व जाहीरात www.mahapolice.gov.in वेबसाईटवर जाहीर होते.तसेच राज्यातील स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर होते.
ऑनलाईन अर्जमहाराष्ट्रातील कोणत्याही आस्थापनेवर भरतीला जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो सदर अर्ज हा एकाच आस्थापनेसाठी भरावा लागतो.उमेदवाराला दोन ठिकाणी अर्ज भरता येत नाही.
कागदपत्रे तपासणीविशिष्ट दिवशी,विशिष्ट ठिकाणी उमेदवाराची मुळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात येते.त्याचवेळ शारीरिक चाचणी होते किंवा त्यानंतरची विशिष्ट तारीख वेळ दिली जाते.
शारीरिक चाचणी१०० गुणांची शारीरिक चाचणी दिवसभरात कधीही घेतली जाते.प्रवर्गनिहाय भरतीच्या एकूण जागा गुणीले १५ एवढया संख्येत विद्यार्थी लेखी परीक्षेस पात्र ठरवले जातात. (उत्तीर्ण होणेसाठी कमीत कमी ५० मार्क आवश्यक आहेत.)
लेखी परीक्षा१०० प्रश्न असलेली १०० गुणांची १ तास ३० मिनीटे वेळ असणारी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका होते.
निकालशारिरीक चाचणी व लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे जातनिहाय अंतिम गुणवत्ता यादी व वेटींग लिस्ट प्रसिध्द केली जाते.
वैद्यकीय चाचणीअंतिम गुणवत्ता यादीमध्ये ज्या उमेदवाराचे नाव आहे अशा उमेदवारंची वैद्यकीय चाचणी जिल्हा रुग्णालयात होते.
साक्षांकन फॉर्मवैद्यकीय चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांच्या संपुर्ण माहीतीचा साक्षांकन फॉर्म भरुन घेतला जातो.
पोलीस व्हेरीफिकेशनपोलीस भरती झालेल्या मुलाविरुध्द स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कोणता गुन्हा दाखल आहे किंवा नाही तसेच त्याचे क्रिमीनल रेकॉर्ड पाहिले जाते.
नोकरी मिळालीपोलीस शिपाई पदी संबंधित आस्थापनेवर प्रशिक्षणासाठी रुजु होणे.
प्रशिक्षण केंद्रज्या प्रमाणात प्रशिक्षण केंद्र रिकामी होतील त्याप्रमाणात मेरीट लिस्टप्रमाणे उमेदवारांस प्रशिक्षणास पाठविले जाते.
पुर्ण पेालीस /कर्तव्यावर रुजु१ वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन एक पूर्ण पोलीस शिपाई तयार होतो.

पोलीस पाटील

अटी व पात्रता
वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षापर्यंत
शैक्षणिक अर्हता- १० वी पास
अर्जदार हा त्याच गावचा रहिवाशी असावा. अर्जदार याची त्याच गावात जमीन/घर असावे. उमेदवार क्रिमीनलेबाबत पोलीस ठाणेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. विवाहीत उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडावे. दोन पेक्षा जास्त अपत्य नसलेबाबत १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करावी.
मानधन - ३०००

महाराष्ट्र पोलीस दलात इतक्या संधी आहेत

राज्य पोलीसवायरलेस पोलीसगुप्तवार्ता विभाग
पोलीस शिपाईपो.हवा. - मॅकेनिकल व ऑपरेटरसहा.गुप्तवार्ता अधिकारी
पोलीस शिपाई बिगुलरपो.उप.निरीक्षक वायरलेसवरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी
पोलीस शिपाई चालकडी.वाय.एस.पी वायरलेसआय.आर.बी
मोटार परिवहन विभागजेल पोलीस /तुरुंग पोलीससशस्त्र पोलीस शिपाई
मॅकेनिकलजेल पोलीस शिपाईकुक,झाडु,मोची,बार्बर,शिंपी
आर.टी.ओतुरुंग अधिकारीसागरी पोलीस
रेल्वे पोलीसफिंगर प्रिंट ब्युरो पोलीसपोलीस शिपाई
शिपाईपो.शिपाईपोलीस उप निरीक्षक
पी.एस.आयपोलीस उप निरीक्षकराज्य राखीव पोलीस दल
एम.पी.एस.सीएक्साईज /उत्पादन शुल्क पोलीससशस्त्र पोलीस शिपाई
पी.एस.आयपोलीस शिपाईकुक,झाडु,मोची,बार्बर,शिंपी
डी.वाय.एस.पीपोलीस उप निरीक्षकमहाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स