तलाठी / लिपीक

पदमहसुल प्रशासन वर्ग - ३ चे पद आहे.
वयोमर्यादाओपन १८ ते ३८ पर्यंत,मागासवर्गीय १८ ते ४५ वर्षापर्यंत,अपंग - ४५ वर्षापर्यंत तसेच शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे.
निवड प्रक्रीयाजिल्हा निवड समिती मार्फत सरळ सेवेने गुणवत्ता यादीन्वये निवड होते.
परीक्षावर्षातून एकदा होते किंवा दोनदा संपुर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्रातील केंद्रेप्रत्येक जिल्हयामध्ये विविध केंद्रावर परीक्षा होते.
पेपर१०० प्रश्नांचा २०० गुणांची एक बहुपर्यायी प्रश्नपत्रिका परीक्षा वेळ - १ तास ३० मिनीटे.
अभ्यासक्रम१.मराठी व्याकरण २.गणित ३.बुद्धिमत्ता ४.सामान्य अध्ययन व चालु घडामोडी.
निकाललेखी परीक्षेच्या मार्कांवरुन संवर्ग निहाय गुणवत्तेनुसार निवड होते.
मुलाखतमुलाखत घेतली जात नाही.
निकालपरीक्षेनंतर साधारणत: दोन तीन आठवडयामध्ये लागतो
नियुक्तीजिल्हा दंडाधिकारी यांचे अधिपत्याखाली त्या- त्या जिल्हयाचे महसुल विभागामध्ये.
वेतनश्रेणीपे स्केल ५२०० – २०२०० ग्रेड पे – २४०० महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते ऑगस्ट २०१६ पासुन ७ वा वेतन आयोग लागु त्यानुसार वेतन मिळेल.नियमानुसार असणारे सर्व भत्ते.

लिपीक टंकलेखक विशेष पात्रता

टायपिंगमराठी प्रति मिनीट ३० शब्द किंवा इंग्रजी प्रति शब्द ४० शब्द टायपिंगचे शासकीय वाणिज्य विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.