एन.डी.ए

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) खडकवासला जि.पुणे आर्मी ,नेव्ही, हवाईदल

शैक्षणिक पात्रता अर्ज करताना उमेदवार १२ वी मध्ये शिकत असावा किंवा १२ वी पास असावा. एन.डी.ए च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार कला,वाणिज्य,किंवा विज्ञान शाखेचा विदयार्थी चालतो.हवाई व नौदल साठी उमेदवार १२ वी मध्ये गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावा.
वयोमर्यादा प्रवेश घेताना १६ वर्ष ६ महिने ते १९ वर्ष ६ महिने आवश्यक आहे.
निवड प्रक्रीया यु.पी.एस.सी मार्फत घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा पास होऊन त्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी) ची मुलाखत उत्तीर्ण होणे आहे.
परीक्षा वर्षातून एप्रिल व सप्टेंबर महिन्यात अशी दोनदा भारतातील सर्व परीक्षा केंदावर होते.
महाराष्ट्रातील केंद्रे मुंबई,नागपूर,गोवा
पेपर१)गणित - ३०० मार्क २) सा.अध्ययन - ६०० मार्क
परीक्षा वेळ २ तास ३० मिनीटे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतले जातात.
अभ्यासक्रम१. गणित - ११ वी व १२ वी चा अभ्यासक्रम असतो. २.सा.अध्ययन - या पेपरमध्ये इंग्रजी,फिजीक्स,केमिस्ट्री,इतिहास भुगोल,बॉयोलॉजी,भारतीय राज्यघटना,व चालु घडामोडी (इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतचा शालेय अभ्यासक्रम असतो.)
निकाल लेखी परीक्षा घेतल्यानंतर ३ महिन्यांनी निकाल लागतो.
मुलाखत जे उमेदवार लेखी परीक्षा पास होतात त्यांची एस.एस.बी मार्फत होणा-या मुलाखतीसाठी निवड होते.
मुलाखत २ टप्प्यात एकूण ५ दिवस चालते
टप्पा १ - स्क्रिनिंग टेस्ट - दाखविलेल्या चित्रावरुन गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे. जे पहिल्या टप्प्यात पास होतात ते दुस-या टप्प्यासाठी पात्र ठरतात.
टप्पा २ – अ) मानसशास्त्रीय चाचण्या - दिलेल्या चित्रावरुन गोष्ट लिहिणे ,दिलेल्या शब्दावरुन वाक्य तयार करणे,विविध परिस्थितीतून मार्ग कसा काढणार हे लिहायचे असते. ब) ग्रुप टास्क - उमेदवार संघनायक म्हणुन कसे काम करु शकतो हे पाहिले जाते.गटचर्चा होते. सर्व संभाषण इंग्रजीमध्ये करावे लागते. क) वैयक्तिक मुलाखत घेतली जाते.- यामध्ये तीन मिनीटे एखादया विषयावर बोलावे लागते तसेच तीन मिनीटात एखादा अडथळा पार पाडणे अशा प्रकारची टेस्ट असते. अॅप्टीटयुट बॅटरी टेस्ट - हवाई दलात वैमानिक होऊ इच्छीणा-या उमेदवारांसाठी ही टेस्ट घेतली जाते.(पायलट टेस्ट)
निकाल मुलाखतीच्या ५ व्या दिवशी निकाल जाहीर केला जातो.
वैद्यकीय चाचणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
शाखा निवड गुणवत्ता यादी तसेच पसंती क्रमानुसार आर्मी,नेव्ही,एअर फोर्स साठी निवड होते.
प्रशिक्षण प्रशिक्षण कालावधी एकूण तीन वर्षाचा असतो. सदर प्रशिक्षण हे एन.डी.ए खडकवासला येथे चालते. प्रशिक्षणामध्ये पदवी अभ्यासक्रमाबरोबर शारीरिक व मिलिट्रीचे प्रशिक्षण पुर्ण केले जाते.
फिल्ड प्रशिक्षण वरील तीन वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर १ वर्षाचे फिल्ड प्रशिक्षण होते. सदर फिल्ड प्रशिक्षण संपल्यानंतर एक आर्मी ऑफिसर तयार होतो.
नियुक्ती आर्मी ,नेव्ही, हवाई दलामध्ये अधिकारी म्हणुन नियुक्ती होते.
प्रवेशासाठी महत्वाच्या संस्था सैनिक स्कुल सातारा जि.सातारा राज्य - महाराष्ट्र राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज डेहराडुन राज्य - उत्तरांचल सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिटयूट,औरंगाबाद, राज्य - महाराष्ट्र
एन.डी.ए मध्ये प्रवेश घेणेसाठी श्रीमंतीची गरज नाही,फार हुशार असावे लागत नाही,रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो तरच एन.डी.ए मध्ये प्रवेश मिळतो ही बाब चुकीची असुन सामान्य कुटुंबातील मुलेही एन.डी.ए मध्ये निवड होऊन अधिकारी झालेली आहेत. कोणताही न्युनगंड न बाळगता व्यवस्थित नियोजन केले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही सैन्यात अधिकारी होऊ शकतात.